विधानसभा मतदानासाठी बारा पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. File Photo
सोलापूर

मतदार फोटो, ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 कागदपत्रे ग्राह्य

Maharashtra Assembly Elections | प्रवासी भारतीयांना त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : आज, 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. यासाठी ग्राह्य धरल्या जाणार्‍या ओळखपत्रांची यादी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. यात निवडणूक आयोगाच्या ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 ओळखपत्रांचा समावेश करण्यात आला आहे. या 12 ओळखपत्रांपैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदाराला मतदान करता येणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ज्या मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आहे ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील. जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत त्यांना मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त 12 पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे.

ओळखपत्राचे हे 12 पुरावे मतदानासाठी ग्राह्य असणार आहेत. यामध्ये मतदानावेळी मतदारांना दिलेले निवडणूक ओळखपत्र नसल्यास 12 प्रकारच्या पुराव्यांमध्ये आधार कार्ड, मनरेगा अंतर्गत दिलेले रोजगार ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्टकार्ड, वाहनचालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), पॅनकार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, पारपत्र (पासपोर्ट), निवृत्तीवेतन दस्तावेज, केंद्र अथवा राज्य सरकार तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना वितरित केलेले छायाचित्रांसह ओळखपत्र, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र, हे 12 पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.

छायाचित्रासह मतदार ओळखपत्रान्वये मतदाराची ओळख पटत असेल तर मतदार ओळखपत्रातील किरकोळ विसंगती दुर्लक्षित करण्यात येणार आहे. छायाचित्रासह मतदार ओळखपत्रावरील विसंगत छायाचित्रामुळे मतदाराची ओळख पटणे किंवा पटविणे शक्य नसल्यास मतदारास उपरोक्त पर्यायी कागदपत्रांपैकी एक ओळख कागदपत्र सादर करणे आवश्यक राहणार आहे, तरी प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी केवळ त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT