सोलापूर : केगाव-हत्तूर बायपास रोडवर पुन्हा अपघाताची मालिका सुरू झाली. शुक्रवारी (दि.25) पहाटे गाडी बाजूला लावून लघुशंकेस उतरलेल्या दोन भावांना भरधाव येणार्या कारने उडवले. त्यात एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाला. परखाराम देवासी आणि त्यांचा चुलत भाऊ सावलाराम देवासी हे दोघे लघुशंका आटोपून त्यांच्या गाडीकडे जात असताना भरधाव येणार्या कारने (एम.एच. 25 ए.जी. 0935) त्यांना उडवले. यामध्ये देवासी बंधू गंभीर जखमी झाले.
धडक देणार्या कारचालकाने त्यांना तेथेच सोडून पलायन केले. त्यांना उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये सावलाराम देवासी याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. परखारामा देवासी हे गंभीर जखमी झाले आहेत. मागीलाल तेजराम देवासी ( रा. रायपूर, छत्तीसगड) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.