सोलापूर

जालनेच्या घटनेनंतर सांगोला सकल मराठा समाजाच्यावतीने रस्ता रोको आंदोलन

अमृता चौगुले

सांगोला (सोलापूर), पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्हातील सराटी येथे मराठा समाजावर अमानुष लाठी चॉर्ज केला व महिला व आंदोलन कार्यकत्यावर अन्याय केला. याच्या निषेधार्त सांगोला येथे सकल मराठा समाजाच्यावतीने शहरातून पायी मोर्चा काढण्यात आला. सागोला ते पंढरपूर रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने समाज बांधव सामील झाले होते.

सराटी जिल्हा जालना येथे मराठा समाजाचे कार्यकर्ते मराठा समाजाला ५० टक्के ओबीसीमध्ये आरक्षण मिळावे. या मागणीसाठी आंदोलन चालू केले होते. या आंदोलनाला मोडीत काढण्यासाठी प्रशासनाने आंदोलकावर लाठी चार्ज व गोळीबार केला.

या निषेध करत सांगोला तालुक्‍यातील सकल मराठा समाजाच्यावतीने महात्मा फुले चौक येथे आंदोलन सुरू केले. सरकारच्या विरोधात घोषणा देत, सरकारचा निषेध करत, पायी मोर्चा संपर्ण शहरभर काढण्यात आला. शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून हे आंदोलन महात्मा फुले चौक, रेल्वे स्टेशन, नेहरू चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक, जय भवानी चौक, कचेरी रोड, तहसील कार्यालय, पंचायत समिती पर्यंत काढण्यात आला. तसेच आंदोलकांनी रस्ता रोकोही केले. यावेळी मोठ्या प्रमाणात सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते सामील झाले होते.

.हेही वाचा 

SCROLL FOR NEXT