करमाळा : करमाळा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरीराविषयी व इतर गुन्हे दाखल असलेल्या 449 आरोपींवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 126 प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली.
करमाळा पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवर दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या तसेच शारीरिक विषयी इतर गुन्ह्यातील 11 आरोपींवर हद्दपरीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून उपविभागीय अधिकारी माढा विभाग कोठडी यांच्याकडे सादर केला आहे.
निवडणुकीच्या काळात कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शरीरविषयक गुन्हे असलेले अवैध धंदे करणारे तसेच मागील निवडणुकीच्या संदर्भात ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत अशा तब्बल 102 आरोपीवर निवडणुकीच्या काळात तात्पुरत्या स्वरूपात हद्दपारिचे प्रस्ताव तयार करून उपविभागीय अधिकारी दंडाधिकारी माढा विभाग, कुर्डूवाडी यांच्याकडे सादर केलेे आहेत. बेकायदेशीर दारू धंदे करणारे व ज्या आरोपीवर दोन किंवा अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अशा 32 आरोपीवर दारूबंदी अधिनियम कलम 93 प्रमाणे प्रस्ताव तयार करून सादर केलेे आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने 64 दारूबंदीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 129 प्रमाणे 12 आरोपीवर प्रतिबंधक कारवाईचे प्रस्ताव अप्पर पोलीस अधीक्षकांकडे पाठवण्यात आले असून सदर आरोपीकडून चांगल्या वर्तवनुकीचे बॉण्ड घेण्यात आले आहेत. निवडणूक कालावधीत नागरिकांनी शांतता राखून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, कायदा मोडणार्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी ग्रामीण तसेच अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात येत आहे.
करमाळा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्यात दोनपेक्षा अधिक गुन्हे असलेल्या व्यक्तीवर तसेच अवैध धंदे करणार्यांवर कारवाई करण्याची मोहीम आखण्यात आली आहे. काहींना तात्पुरते हद्दपार करणे तर काहींना चांगल्या वर्तवणुकीच्या जामिनावर कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखावी. कायदा मोडणार्यांवर कडक कारवाई केली जाईल.
- विनोद घुगे, पोलीस निरीक्षक