Solapur Burglary cases: घरफोडींसह सोळा गुन्ह्यातील आरोपी जेरबंद Pudhari
सोलापूर

Solapur Burglary cases: घरफोडींसह सोळा गुन्ह्यातील आरोपी जेरबंद

ग्रामीण पोलिस दलाच्या गुन्हे शाखेची कामगिरी

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विविध पोलिस ठाणेच्या हद्दीतील तीन घरफोडींसह सोळा गुन्ह्यामधील हवा असलेला आरोपी राहुल काळे याला पकडण्यासाठी पंढरपुरातील बसस्थानक परिसरात सापळा लावला होता. मात्र, आरोपी काळे याने पोलिसांना पाहुन पळून जाण्याचा प्रयत्न केला.

मात्र, सापळा लावलेल्या पथकातील पोलिस अंमलदार यांनी त्याचा पाठलाग करुन मोठ्या शिताफीने त्याला पकडले. त्याला ताब्यात घेतले असून ही कारवाई ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.

सोलापूर तालुका, करकंब, मोहोळ, वळसंग, माढा, अकलूज, माळशिरस व पंढरपूर आदी ग्रामीण पोलिस ठाणेच्या हद्दीतील विविध गुन्ह्यात पोलिसांना हवा असलेला आरोपी राहुल रतिलाल काळे (वय 30, रा. करकंब, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) हा पंढरपूरच्या बसस्थानक परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बसस्थानक परिसरात सापळा लावला. आरोपी काळे हा बसस्थानकातील पोलिसांना पाहून पळून जाऊ लागला. तेथील उपस्थित पोलिसांनी त्याचा पाठलाग केला व त्याला ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर त्याला जिल्ह्यातील विविध गुन्ह्यातील चोरीतील मुद्देमालाविषयी व गुन्ह्यांच्या धर्तीवर विचारणा केली असता त्याने त्याच्या अन्य साथीदारांसोबत कॉपर वायरच्या चोरीचाही गुन्हा केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के, प्रकाश कारटकर, सलीम बागवान, मोहन मनसावाले, धनराज गायकवाड, प्रमोद शिंपाळे, योगेश जाधव आदींनी ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT