file photo 
सोलापूर

सोलापूर : अकलूजमध्ये अपघात! ट्रकच्या धडकेत सायकलस्वार ठार

backup backup

अकलूज; पुढारी वृत्तसेवा : अकलूज येथील प्रतापसिंह चौकात घराकडे परतणा-या सायकल स्वाराला ट्रकने धडक दिल्याची घटना आज (दि. २५) घडली. या घटनेत सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. अकलूज पोलीस ठाण्यात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अकलूज पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज (दि. २५) सकाळी ११:३० च्या सुमारास पोपट दाजी एकतपुरे हे अकलूज येथुन शिवतेजनगर-शंकरनगर येथील घराकडे सायकलवरुन जात होते. यावेळी अकलुज येथील प्रतापसिंह चौकात माळेवाडीकडुन भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने (क्र.एमएच १६ सीसी ६०४८) जोरदार धडक दिली. पोपट एकतपुरे हे सायकलवरून पडून जागीच मृत झाले. अपघातानंतर ट्रकचालक अनिकेत अंकुश कवडे (रा. कर्जत) प्रतापसिंह चौकातुन बायपास रोडने ट्रकसह पळुन जात होता. मात्र नागरीकांनी त्याला पकडुन पोलिसांच्या ताब्यात दिले.

अकलूज पोलीस ठाण्यात ट्रक चालक अनिकेत कवडे याच्यावर सायकलस्वार पोपट एकतपुरे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा अधिक तपास पो.काॅ.जमीर शेख हे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT