सोलापूर : कामाचे अमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याची घटना सोलापुरात घडली आहे. या प्रकरणी संशयित नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरुण कापसे (वय.६० रा.बाळे, सोलापूर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. कापसे याने तरुणीला नोकरीचे अमिष देत स्वतःच्या प्लॉटवर नेऊन इच्छे विरोधात जबरदस्ती केली. या प्रकरणी अत्याचार व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, संशयित आरोपी अरुण कापसे याने बुधवारी (दि.२८) बाळे येथील एका प्लॉटवर नेऊन दुपारी काम मिळवुन देतो असे अमिष दाखवून अत्याचार केला. तसेच ही घटना कोणाला सांगितल्यास तुला जीवे मारीन अशी धमकी दिली. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून,अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने हे करत आहेत.