ABHA card 
सोलापूर

ABHA card: शिक्षकांना आभा कार्ड अनिवार्य

खासगी शाळांसाठी शिक्षण उपसंचालकांचे पत्र; पाच लाखांपर्यंत मोफत उपचार

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : राज्यातील 100 टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत कार्ड काढणे अनिवार्य केले आहे. तसे पत्र शिक्षण उपसंचालक यांनी काढले आहे. त्यामुळे आता शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजना अंतर्गत शिक्षकांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व संबंधित कर्मचाऱ्यांनी आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट कार्ड काढावे, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने याबाबत राज्यातील विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि वेतन पथकांना पत्र पाठविले आहे.

शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व 100 टक्के अनुदानित खासगी शाळांमधील कर्मचाऱ्यांचा या आरोग्य योजनेत समावेश करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला वर्षाला पाच लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य संरक्षण मिळणार आहे.

शंभर टक्के अनुदानित खासगी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत कार्ड काढण्याचे शासनाने बंधनकारक केले आहे. तसे पत्र प्राप्त झाले आहे. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर आयुष्मान भारत कार्ड काढून घ्यावे.
- सचिन जगताप, शिक्षणाधिकारी, माध्यमिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT