आर्थिक वादातून झालेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू File Photo
सोलापूर

आर्थिक वादातून झालेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

आर्थिक वादातून केलेल्या मारहाणीत जखमी तरुणाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रेणुकानगर येथील मोकळ्या मैदानात शुक्रवारी घडली होती. याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अथर्व दिनेश जाधव (वय 19, रा. सरस्वती बिल्डिंग, विजापूर रोड) असे खून झालेल्याचे नाव आहे. प्रसाद लोंढे, बाळू काळे, सागर कदम, केदार गुमटे, मनोज सूर्यराव ऊर्फ भाईजी, अजिंक्य शाबादे, प्रकाश शिंदे ऊर्फ बुद्धा, जॉकी थोरात, विनायक जाधव व त्यांचे इतर साथीदारांवर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील विजापूर नाका परिसरात राहणार्‍या 19 वर्षीय तरुणाला शुक्रवारी (दि.4) ऑक्टोबर रोजी आठ ते दहा जणांनी जबर मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी शहरातील अश्विनी हॉस्पिटल येथे दाखल केले. परंतु शनिवार पाच ऑक्टोबर रोजी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, मृताचे वडील दिनेश प्रकाश जाधव यांच्या फिर्यादीनुसार इंडियन मॉडेल इंटरनॅशनल शाळेच्या पाठीमागे रेणुका नगर येथील मोकळ्या मैदानात व तेथेच असणार्‍या पत्र्याच्या शेडमध्ये सोलापूर ते अश्विनी हॉस्पिटल दरम्यान अथर्व जाधव व त्याच्यासोबत असणारे प्रदीप मंगळवेढेकर, शिवकुमार तंबाखे, राहुल साठे, समर्थ माटे यांनाही आठ ते दहा जणांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेचा पुढील तपास सपोनि गायकवाड हे करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT