सोलापूर : जोगवा मागायला आलेल्या दोन महिलांनी तुझ्या नवर्याचा अपघात होणार आहे. तुझ्याकडे जे काही आहे ते परडीत आणून टाक, असे म्हणत एका विवाहितेकडून 65 हजार उकळले.
बाळीवेस येथील शेटे वाड्यात राहणार्या स्नेहा प्रथमेश मंगळवेढेकर या 24 सप्टेंबर रोजी सकाळी लहान मुलासह घरी होत्या. यावेळी अनोळखी दोन महिला जोगवा मागण्यासाठी आल्या. नवर्यावरील संकट टाळण्यासाठी मी पूजा करते. तुझ्याजवळ जेवढे पैसे आहेत तेवढे आणून परडीत टाक, अशी भीती दाखविली. त्यानंतर स्नेहा हिने गाडी घेण्यासाठी ठेवलेले 65 हजार रुपये महिलेला दिले. पती घरी आल्यानंतर घडलेला प्रकार स्नेहाने सांगितला. यानंतर त्यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत आणि तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली एका महिलेस ताब्यात घेतले. सपोनि अजित पाटील तपास करीत आहेत.