सोलापूर : राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) स्वयंसेवक आषाढी वारीत सहभागी होऊन एकता आणि समरसतेचे दर्शन घडवणार आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठांतर्गत चार हजार एनएसएसचे स्वयंसेवक यात सहभागी होतील.
यामध्ये 600 पोलीस मित्र म्हणून तर तीन हजारांहून अधिक स्वच्छतादूत म्हणून वारकर्यांच्या सेवेत रुजू होणार आहेत. याशिवाय वृक्षारोपणासाठीही ते पालखी मार्गावर सहभागी होणार आहेत. विद्यापीठाचा आरोग्यसेवेचा स्टाफही या विद्यार्थ्यांसोबत उपस्थित राहणार आहे. या विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागामुळे वारीत एकता आणि समरसतेची भावना अधिक दृढ होणार आहे. विविध जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन सामुदायिक सेवा करत असल्याने सामाजिक सलोखा वाढण्यास मदत होईल.
स्वच्छतेची काळजी घेण्यासोबतच वारकर्यांना मदत करून हे स्वयंसेवक महाराष्ट्राची गौरवशाली सांस्कृतिक परंपरा अनुभवणार आहेत. तसेच सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून देणार आहेत. याचा सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या जडणघडणीवर होणार आहे.
राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) तीन हजाराहून अधिक स्वयंसेवक आषाढी वारीत केवळ स्वच्छतादूत नाहीत, तर ते ’माऊली’ बनून वारकर्यांची सेवा करणार आहेत. तरुण-तरुणी वारी मार्गावर स्वच्छता राखण्यासोबतच, थकलेल्या वारकर्यांचे पाय दाबून देणे आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे यांसारख्या विविध सेवा देणार आहेत. वारकर्यांशी संवाद साधून, त्यांचे सुख-दुःख वाटून घेत हे स्वयंसेवक माणुसकी आणि सेवाभावाचा अनोखा अनुभव घेता येणार आहे.
विद्यापीठाचे 600 राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) स्वयंसेवक आषाढी वारी सोहळ्यात पोलीस मित्र म्हणून कार्यरत असतील. हे विद्यार्थी वाहतूक नियंत्रण आणि गर्दी व्यवस्थापनात मदत करत, वारकर्यांना सुरक्षित प्रवासासाठी सहकार्य करतील. ज्यामुळे वारीत सुव्यवस्था राखण्यास मोलाचा हातभार लागणार आहे.
आषाढी वारीमध्ये सोलापूर विद्यापीठाचे चार हजार राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) स्वयंसेवक ऊन, वारा, पाऊस झेलत, तन-मन-धनाने वारकर्यांची सेवा करणार आहेत. पांडुरंगाच्या दर्शनासाठी येणार्या लाखो भाविकांना यामुळे मोठा आधार मिळतो. सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य आणि कार्यक्रम अधिकारी यांच्या सहकार्यामुळे हे शक्य होते.- राजेंद्र वडजे, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना