कार आणि टेम्‍पोच्या भीषण अपघातात ४ जणांचा जागीच मृत्‍यू Pudhari Photo
सोलापूर

कार आणि टेम्‍पोच्या भीषण अपघातात ४ जणांचा जागीच मृत्‍यू

पुढारी वृत्तसेवा

नातेपुते : पुढारी वृत्तसेवा

नातेपुते-फलटण राष्ट्रीय महामार्गावरील कारूंडे पुलाजवळ आज (रविवार) सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान टेम्पो व कार यांच्यात भीषण धडक झाली. यामध्ये कार चालक राजेश अनिलकुमार शहा (वय ५४ वर्ष) दुर्गेश शंकर घोरपडे (वय २७ ) कोमल विशाल काळे (वय 32) शिवराज विशाल काळे (वय १०) सर्व राहणार जंक्शन (ता.इंदापूर) यांचा अपघातात मृत्‍यू झाला. आकाश दादा लोंढे, अश्विनी दुर्गेश घोरपडे, सुरज लोंढे हे तीन इसम गंभीर जखमी झाले असुन, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जमखींना नातेपुते ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. राजेश शहा, दुर्गेश घोरपडे, कोमल काळे, विशाल काळे यांना डोक्यावर गंभीरपणे इजा होऊन रक्तस्त्राव झाल्यामुळे उपचारापूर्वीच मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

राजेश शहा व इतर सहाजण बलेनो एम.एच ४२ ए.एस ०५६४ या कार मधुन प्रवास करत नातेपुते मार्गे फलटणच्या दिशेने कास पठार येथे पर्यटन करण्यासाठी जात होते. यावेळी काळाने घात केला व टेम्पो क्र. एम.एच.४२ ए. ३३९२ या टेम्पोला जोराची धडक झाली. अपघातानंतर टेम्पो चालक फरार झाला. या घटनेचा पुढील तपास नातेपुते पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक धनंजय ओमासे करीत आहेत.

राष्ट्रीय महामार्गावरील नातेपुते ते मुख्य महामार्गावरील रस्ता क्रॉसींग हे अपघाताचे प्रणव क्षेत्र बनले आहे. नातेपुते शिखर शिंगणापूर चौक येथील या ठिकाणी रस्ता क्रॉसींग रस्त्‍यावर दिशा दर्शक फलक नाहीत. त्यामुळे वाहन चालक व प्रवाशांना मार्गक्रमण करताना वाहन सरळ विरूद्ध उलट दिशेने जाते व भीषण अपघात घडण्यास कारणीभूत ठरत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT