Manoharmama Bhosale 
सोलापूर

Manohar Bhosale Case: भोंदू मनोहर भोसलेच्या नावे चिलवडीत 25 एकर शेतजमीन

उंदरगाव, घोटी, गाणगापूर, पुण्यातील मालमत्ता उघड

पुढारी वृत्तसेवा

करमाळा : भविष्य सांगण्याच्या नावाखाली भक्तांची फसवणूक करणाऱ्या करमाळ्यातील मनोहर भोसले उर्फ भोंदू मनोहर मामा याने अल्पावधीत मोठी संपत्ती उभी केल्याची चर्चा रंगली आहे. उंदरगाव, घोटी येथील शेत जमिनीच्या खरेदीबरोबरच आता करमाळा तालुक्याच्या शेजारी असलेल्या चिलवडी (ता.कर्जत जि. अहिल्यानगर) येथे तब्बल 25 एकर शेती भोंदू मनोहर भोसलेने कोट्यवधी रूपये मोजून खरेदी केल्याची माहिती पुढे आली आहे.

कर्जत तालुक्यातील चिलवडी येथे गट नंबर 22 मध्ये 25 एकर शेतीचा सातबारा भोंदू मनोहर चंद्रकांत भोसले यांच्या नावावर असल्याचे उघड झाले आहे. चिलवडी गाव शिवाराचा परिसर कुकडी प्रकल्पाच्या सिंचनाखाली येत असल्याने सर्वसाधारणपणे एक एकर जमीनीचा भाव 20 ते 25 लाख रुपये एकर आहे. भोंदू मनोहर चंद्रकांत भोसलेने स्वतः:च्या नावावर जमीन खरेदी केली असुन शेतजमीनी घेण्यासाठी कोट्यवधी रूपये मोजल्याची चर्चा आहे.

भोंदू मनोहरचा वाढदिवस पुणे येथील मनाली रिसॉर्ट येथे झाला होता. तेथे कार्यक्रमास राज्यातील तब्बल 90 आमदार उपस्थित होते. पुढील वाढदिवसाला 145 ते 150 आमदार येतील असे मनोहर याने त्यावेळी सांगितले होते.

घोटी, गाणगापूर, पुण्यातमध्ये जागा

उंदरगाव ता. करमाळा येथे मनोहर भोसले चे वडील चंद्रकांत भोसले यांच्या नावावर दोन एकर जमीन असुन त्यावर भोंदू मनोहरने मठ बांधला आहे. तर घोटी ता.करमाळा येथे मनोहरच्या पत्नी रूपालीच्या नावावर 27 एकर शेतजमीन आहे.त्या शिवाय गाणगापूर (कर्नाटक) येथे आश्रमाचे बांधकाम सुरू आहे. पुणे शहरातील मांजरी व हडपसर भागात फ्लॅट असल्याची माहिती मिळाली आहे तर नवीमुंबई येथेही भोंदू मनोहरचे कनेक्शन आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT