File Photo
सोलापूर

सहा वर्षांत घटल्या सतराशे शाळा

School Reduction Maharashtra | शाळा, विद्यार्थ्यांची घटती संख्या चिंताजनक

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : राज्यात मागील सहा वर्षांत लाखो विद्यार्थी आणि एक हजार 705 शाळांची संख्या घटली आहे. ही संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने चिंतेची बाब आहे. शाळा आणि विद्यार्थ्यांची संख्या घटू नये, यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.

मागील सहा वर्षांत लाखो विद्यार्थी आणि दीड हजारांपेक्षा जास्त शाळांची संख्या कमी झाल्याची आकडेवारी यू-डायस प्लस अहवालातून समोर आली आहे. त्यामुळे शिक्षकांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे. मात्र, याकडे शासनासह शिक्षक दुर्लक्ष करत आहेत.

गेल्या काही वर्षांपासून शासनाकडून शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा करण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि शाळांची पटसंख्या वाढणे आवश्यक असताना ती घटत असल्याने शिक्षकांवर उपासमारीची वेळ येण्यास उशीर लागणार नाही.

गेल्या काही वर्षांपासून राज्यातील शाळा आणि विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने घटत आहे. त्यामुळे शासनाने वेळीच सावध होऊन योग्य त्या उपाययोजना करुन शाळा, विद्यार्थी टिकविले पाहिजेत. त्यासाठी शासनाने ठोस पाऊल उचलणे गरजेचे आहे. अन्यथा पुढील काळातही शाळांच्या संख्येत घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गेल्या काही वर्षात राज्यात दीड हजारांपेक्षा जास्त शाळा आणि लाखो विद्यार्थ्यांची संख्या घटली आहे. ही बाब अत्यंत चिंताजनक आहे. शिक्षकांवर विविध उपक्रमांचा भार आणि ऑनलाईन कामे मोठ्या प्रमाणात दिल्याने विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकांना पुरेसा वेळ मिळत नाही. शासनाने पटसंख्या वाढविण्यासाठी विशेष उपक्रम आणि शिकविण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल, यासाठी प्रयत्न करावेत.
-बसवराज गुरव, जिल्हाध्यक्ष, शिक्षक समिती कन्नड
यू-डायसनुसार विद्यार्थी संख्या कमी झाल्याचे कारण म्हणजे, अनेकवेळा विद्यार्थी नोंदणी आणि अपडेट करण्याच्या प्रक्रियेत अडचणी येतात. जसे की विद्यार्थ्यांचे प्रमोशन, दुसर्‍या शाळेतून येणारे विद्यार्थी आणि आधार कार्ड जुळवणे. या प्रक्रियेत तांत्रिक अडचणी आणि चुकांमुळे विद्यार्थी संख्या अचूकपणे नोंदवली जात नाही. तसेच इनव्हॅलिड विद्यार्थी संख्या मोठी आहे. त्यामुळे मागील काही वर्षात लाखो विद्यार्थ्यांची संख्या घटल्याचे दिसत आहे.
-निलेश देशमुख, राज्य सरचिटणीस, शिक्षक सहकार संघटना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT