पंढरपूर : पोलिसांनी पकडलेला गांजा दाखवताना पो.नी. मुजावर व टीम. Pudhari Photo
सोलापूर

पंढरपूर-गुरसाळे रोडवर 147 किलो गांजा जप्त

पंढरपूर तालुका पोलिसांची सर्वात मोठी अवैध गांजा विरुद्ध कारवाई; तिघांवर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : येथील अहिल्यादेवी चौकात दि. 5 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पंढरपूर तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत 147 किलो गांजा व कार गाडी असा मिळून 40 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी पकडला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिसांना माहिती मिळाल्यानुसार गुरसाळे रोडवर अहिल्यादेवी चौकात पोलिसांनी नाकाबंदी केली होती. सदर नाकाबंदी कारवाईच्या वेळेस गुरसाळे येथून अहिल्यादेवी चौकात एक संशयित महिंद्रा एक्स वि फाईव्ह हंड्रेड कार जाताना पंढरपूर तालुका पोलिसांनी अडवून संशयित वाहनाची तपासणी केली. या वाहनांमध्ये प्रदीप दत्तात्रय हिवरे (वय 20) रा. पुरांडवड (ता.माळशिरस) याच्याकडे विचारपूस केली. तेव्हा कार मध्ये मधल्या सीटवर पाठीमागच्या सीटवर एकूण तीन पोते गांजा आंबट उग्र वासाचा एकूण 72 पाकिटामध्ये पॅक करण्यात आला होता. हा गांजा जागीच शासकीय पंचांच्या उपस्थित वजन केला असता एकूण 147 किलो ग्रॅम वजन झाले. गांजा व महिंद्रा कार गाडी एम.एच. 12 एच. व्ही. 56 66) कार एकूण 40 लाख रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केलेला आहे.

कार चालक प्रदीप दत्तात्रय दत्तात्रय हिवरे व त्याचे तीन साथीदार गणेश हनुमंत पवार, गणेश हनुमंत पवार, रा. चिंचपुरी (ता. माळशिरस), प्रमोद उर्फ सोनू मुळीक रा. गुरसाळे (ता. माळशिरस) यांच्याविरुद्ध पंढरपूर तालुका पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पंढरपूर तालुका पोलिसांनी केली आहे. गांजा व कार असा 40 लाखाचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर, पंढरपूर शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके, पीएसआय विक्रम वडणे, पीएसआय भारत भोसले, पीएसआय घुंगुरकर, पीएसआय पिसाळ, सहाय्यक फौजदार विजू गायकवाड, सहायक फौजदार दत्तात्रय तोंडले, साह फौजदार शरद कदम, पोलिस हवालदार विनायक क्षीरसागर, पोलिस कॉन्स्टेबल अमोल गावडे, सुजित उबाळे, पोलिस हवालदार मंगेश रोकडे, पोलिस कॉन्स्टेबल रामकृष्ण खेडकर, सूरज हेंबाडे, सचिन हेंबाडे, पोलीस हवालदार प्रसाद आवटी, पोलिस कॉन्स्टेबल समाधान माने, शहाजी मंडले यांच्या पथकाने केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT