सोलापूर : एक दिवसाच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी सायंकाळी सोलापूर शहर परिसराला पुन्हा पावसाने झोडपून काढले. त्यामुळे नागरिकांची पुन्हा तारांबळ उडाली. दुपारी 3.1 मिमी पाऊस पडल्यानंतर काही वेळ विश्रांती घेऊन सायंकाळी सहा वाजता सुरू झालेला मुसळदार पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरूच होता.
गुरुवारी पहाटे सहावाजेपर्यंत विक्रमी 118.3 मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर एक दिवस विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. बसस्थानक, चौपाड, होटगी रोड, अक्कलकोट रोड एमआयडीसी परिसरात रस्त्यावर पुन्हा एक ते दीड फूट पाणी वाहत होते. अनेक दुचाकी वाहनांना चालविताना अडचणी आल्या. इंजिनला पाणी लागून वाहने बंद पडली. पाण्यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी सुरू झाली.