पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील शेतकरी शिवाजी श्रीमंत रोंगे यांनी ऊस शेतीतून 40 गुंटे मध्ये 125 टन उत्पादन घेऊन विक्रम केला आहे. एकूण दोन एकर मध्ये 250 टन ऊस उत्पादन घेऊन विक्रम केला आहे.
शेतीची मशागत करून पाच फुटी सरी व नेटाफेम कंपनीची ड्रीप केली होती. 86032 या उसाचे बेणे वापरून त्यांनी दोन वेळा उसाची बांधणी केलेली तसेच सेंद्रिय व रासायनिक तसेच जिवाणू खतांचा वापर केला होता. एका उसाचे 52 ते 55 कांड्या होत्या. साधारण एकरी पस्तीस ते चाळीस हजार रुपये खर्च करून विक्रमी उत्पादन घेतले. याकरता त्यांना कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी कुमठेकर व भालेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्या प्लॉटला युवा नेते प्रणव परिचारक , कपिल वाघमोडे, भारत गायकवाड, शिवाजी रोंगे पाटील, श्रीमंत रोंगे पाटील सुनील जाधव उपस्थित होते.
योग्य वेळी लागवड करून पाण्याचे व्यवस्थित नियोजन, वेळेत खत आणि बांधणी व कारखान्याचे मार्गदर्शन यामुळे 40 गुंट्यात 125 टन विक्रमी उत्पादन घेता आले.- शिवाजी रोंगे पाटील शेतकरी खर्डी