सोलापूर : जिल्ह्यात जनगणनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या चार दिवसात 12 हजार 823 कुटुंबांनी स्वगणना पूर्ण केली आहे. उर्वरित नागरिकांनी स्वगणना पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
केंद्र शासनाच्या आदेशानुसार राष्ट्रीय जनगणना उपक्रम अंतर्गत एक ते 15 मेपर्यंत नागरिकांना ऑनलाईन आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. या आवाहनास प्रतिसाद देत चार दिवसात जिल्ह्यातील 16 हजार 394 कुटुंबांनी ऑनलाईन प्रणालीत कुटुंबांची माहितीची नोंदणी संबंधित पोर्टलवर भरली आहे.
राष्ट्रीय जनगणनाकरीता प्रशासनाकडून एकूण पाच हजार 453 पर गट यादी तयार करण्यात आली आहे. नागरिकांना केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत जिल्ह्यातील नागरिकांकडून ऑनलाईन नोंदणी करण्यात येत असून, आतापर्यंत 16 हजार 394 कुटुंबांनी ऑनलाईन नोंदणी केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
दरम्यान, स्वगणनेनंतर 16 मे ते 15 जूनपर्यंत घरगणना करण्यात येणार आहे. त्यानंतर फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष जनगणनेला सुरुवात होत आहे. यावेळी पहिल्यांदाच डिझीटस जनगणना केली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येकांनी आपली माहिती अचूक देणे बंधनकारक असणार आहे. सध्या देशातील सोळावी तर स्वातंत्र्यानंतर आठवी जनगणना होत आहे. जनगणना करताना एकूण 34 प्रश्न विचारले जात आहेत.