Solapur Municipal Corporation : महापालिकेच्या 12 आशा वर्कर निलंबित  File Photo
सोलापूर

Solapur Municipal Corporation : महापालिकेच्या 12 आशा वर्कर निलंबित

35 जणांना नोटिसा; उपायुुक्तांचा दणका; कारवाई टाळण्यासाठी संघटनेचा आरोग्य अधिकार्‍यांवर दबाव

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : महापालिकेच्या आरोग्य विभागातील रुग्ण पळवापळवी प्रकरणाचा पर्दाफाश आरोग्य अधिकार्‍यांनी केला आहे. या प्रकरणात पालिकेच्या प्रसूतिगृहातील आशा वर्करना जबाबदार धरत या प्रकरणात 12 आशा वर्करांना निलंबित करण्याचे आदेश उपायुक्त अशिष लोकरे यांनी दिले आहेत. तर कारवाई टाळण्यासाठी आशा वर्कर संघटनेचा आरोग्य अधिकार्‍यांवर मोठा दबाब आणला जात आहे.

महापालिकेची शहरात आठ प्रसूतिगृहे आहेत. डफरीन चौकातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रसूतिगृह आणि दाराशा प्रसूतिगृहात सर्वाधिक प्रसूती होतात. खासगी रुग्णालयांतील पायाभूत सुविधांच्या तुलनेत ही दोन्ही प्रसूतिगृहे चांगली झाली आहेत. त्यामुळे गोररिबांची आणखी गर्दी होत आहे.या गर्दीचा फायदा घेत

महापालिकेच्या हॉस्पिटल मध्ये आलेले रूग्ण खासगी हॉस्टिपल मध्ये पाठवण्याची टोळी सक्रिय असल्याचे निदर्शनास आले होते. नवी पेठेतील एका हॉस्टिपल मध्ये आरोग्य अधिकार्‍यांनी छापा टाकून कागदपत्राची तपासणी केल्यानंतर धक्कादायक बाब पुुढे आली. नवी पेठेतील एका डॉक्टारांने सोशल मिडीयाचा एक ग्रप तयार केला आहे. त्यामध्ये महापालिकेच्या हॉस्पिटल मधिल 35 आशा वर्कर या ग्रुुप मध्ये आहे. या ग्रुपच्या माध्यमातून आशा वर्कर यांना आर्थिक आमिष दाखवत टोळीने महापालिकेत आलेेले रुग्ण पळवत असल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकरणात तब्बल 12 आशा वर्कर यांच्या नावे 12 बंद पाकिटे सापडली होती. त्यावर पाठवलेल्या रुग्ण आणि आशा वर्करची त्यांची नावे होती.

खुलासा समाधानकारक नसल्यास कारवाई

नवी पेठेतील श्रेयस हॉस्पिटलचे सुुमित सुरवसे,श्रध्द सुुरवसे यांंना नोटीस दिली आहे. चार दिवसाची मुदत आहे. खुुलासा समाधानकारक नाही आल्यास हॉस्पिटलची मान्यता रद्द केली जाईल. ज्या आशा वर्करला हाताशी धरून हा प्रकार केला.त्या 13 आशा वर्करांना उपायुक्तांच्या आदेशाने निलंबित केले आहे.

कारवाई टाळण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न

आशा वर्कर यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. हे समजताच संघटनेच्या अध्यक्षा पाटील यांनी सर्व आशा वर्कर यांना घेऊन कारवाई टाळण्यासाठी आरोग्य अधिकार्‍यांवर दबाव आण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी उपायुक्त अशिष लोकरे यांच्या दालनात बैठक झाली महापालिका प्रशासन कारवाई ठाम राहिल्याने संघटनेच्या अध्यक्षांनी काढता पाय घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT