पुढारी ऑनलाईन न्यूज :
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य शूटर शिवकुमार गौतम याची गुन्हे शाखेकडून चौकशी सुरु आहे. यावेळी त्याने धक्कादायक कबुली दिली आहे. गौतमने खुलासा केला आहे की पुण्यात राहत असताना त्याने बिश्नोई टोळीचा प्रमुख लॉरेन्स बिश्नोई याच्याशी थेट ऑनलाइन संवाद साधला होता.
दोघांच्या या संभाषणादरम्यान बाबा सिद्दीकीला मारल्यानंतर पोलिसांनी पकडले तर घाबरू नका. माझा माणसे काही दिवसातच तुरुंगातून तुझी सुटका करतील असे वचन लॉरेन्स याने दिल्याचे गौतमने म्हटले आहे. त्याचबरोबर बिश्नोईने गौतमला त्याच्या सुटकेनंतर १२ लाख देऊन त्याला परदेशात स्थलांतरित करण्याचे आश्वासन देखील दिले आहे.
या संभाषणामध्ये बिष्णोई टोळीच्या वकिलांच्या एक टीमचा उल्लेख करण्यात आला होता. जो त्याला अटक झाल्यास काही दिवसांत त्याची सुटका करतील. त्याचबरोब क्राइम ब्रँचच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की बिश्नोई टोळी ने या तरुणांचे ब्रेन वॉशिंग केले आहे. दरम्यान अटक केल्यानंतरही शिवकुमारच्या चेहऱ्यावर भीती किंवा पश्चात्ताप झाल्याची कोणतीही चिन्हे दिसत नव्हती. तसेच आपली लवकरच सुटका होईल असा त्याचा ठाम विश्वास देखील आहे. असे एका तपास अधिकाऱ्यांने सांगितले.