सातारा

‘सोन्या अन छब्या’ ला ‘लम्पी’ने गाठले; पुकळेवाडीतील दोन बैलांचा मृत्यू चटका लावणारा

अनुराधा कोरवी

वरकुटे – मलवडी : पुढारी वृत्तसेवा :  कोरोना महामारीमध्ये अनेक कुटुंब उद्ध्वस्त होताना सर्वांनी पहिली. मात्र, आता ', लम्पी आजाराने तसाच धुमाकूळ घातला असून माण तालुक्यातील पुकळेवाडी येथे लम्पी आजाराने दोन बैलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने शेतकऱ्यांची मने हेलावली आहेत.

माण तालुक्यातील अनेक गावात लम्पी आजाराने धुमाकूळ घातला आहे. मात्र, सरकार व पशुसंवर्धन विभाग तितकासा गंभीर नसल्याचे चित्र आहे. अनेक शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. पुकळेवाडी येथे स्वर्गीय वस्ताद पुकळे यांनी पोटच्या मुलाप्रमाणे सभाळ केलेली व वडिलांची आठवण म्हणून त्यांच्या पाठीमागे त्यांची मुले उत्तम व प्रकाश यांनी या सोन्या व छब्या या बैलजोडीचा सांभाळ केला होता. दोन सख्या भावासारखी ही बैलजोडी पुकळे यांच्या दावणीला होती. घरातील लहान मुलाला सुद्धा ही जोडी ओळखत होती.

एकजण दावणीला नसेल तर दुसरा हंबरडा फोडत होता. मात्र, छब्या व सोन्याला एकाच वेळी लम्पी महामारीने गाठले. लंपीची लागण झाली व दोनच झाला. अनेक वर्षे ही बैल जोडी पुकळे यांच्या घरी होती. त्यामुळे घरातील माणसापेक्षा या जोडीवर सर्वांचं प्रेम होत. सोन्या व छब्या यांच्या जाण्याने पुकळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर घरातील सर्वजण धाय मोकलून रडत आहेत. लंपी आजाराने आमच्या दावणीची जनावरे नव्हे तर माणसं गेल्या इतकं दुःख असल्याचे उत्तम पुकळे व प्रकाश पुकळे या बंधूंनी सांगितले. त्यामुळे जनावराच्या या आजारावर सरकारने ठोस उपचारासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणीही पुकळे यांनी केली

सिद्धनाथाच्या बगाडाचा होता मान

पुकळेवाडी येथील सिद्धनाथ देवाच्या बगाडाचा मान सोन्या व छब्याला होता, तर काही दिवसांपूर्वी वाई येथील बगाडासाठी सोन्या व छब्याला मागणी आली होती. मागाल ती किंमत देऊ, अशी विनंती केली होती. मात्र, आमच्या वडिलांची आठवण म्हणून आम्ही ही बैलजोडी सांभाळत होतो. मात्र लम्पीने आमचा घात केला अशा शब्दात आपले दुःख पुकळे बंधूनी व्यक्त केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT