सातारा

सातार्‍यात कस्तुरींसोबत रंगणार स्टार प्रवाहचा हळदी-कुंकू सोहळा

दिनेश चोरगे

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  दै. 'पुढारी' कस्तुरी क्लब व स्टार प्रवाह यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. 9 जुलै रोजी दुपारी 3 वा. सैनिक स्कूल सभागृह, सदरबझार, सातारा येथे हळदी-कुंकू सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी धम्माल गेम शो, लकी ड्रॉ व हमखास गिफ्ट कूपन्सचा वर्षाव होणार आहे.

कस्तुरी क्लब नेहमीच महिलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देते. याचाच एक भाग म्हणजे दै.'पुढारी' कस्तुरी क्लब आयोजित आणि स्टार प्रवाह प्रस्तुत हा रंगतदार कार्यक्रम होत असून कस्तुरी सदस्यांसाठी धम्माल वन मिनिट गेम शो होणार आहे. स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' यातील मुख्य कलाकार सायली व कल्पना हे कस्तुरींशी या मालिकेबद्दल दिलखुलास संवाद साधणार आहेत. धम्माल मनोरंजनाबरोबरच बक्षीसांची लयलूट करण्याची संधी महिलांना मिळणार आहे. तसेच तनिष फार्मिंग ज्वेलरीकडून प्रथम येणार्‍या 500 महिलांना हमखास गिफ्ट कूपन दिले जाणार आहे.

लकी ड्रॉमध्ये शिंदे स्टील फर्निचर- ड्रेसिंग टेबल, गणेश गोल्ड ज्वेलर्स-2 चांदीचे पैंजन, तनिष फर्मिंग ज्वेलरी-2 गंठन दिली जाणार आहेत. हा कार्यक्रम सर्व महिलांसाठी खुला असून महिलांनी याचा लाभ घ्यावा. महिलांनी येताना केशरी, लाल व निळा या रंगातीलच साडी किंवा ड्रेस परिधान करावा. अधिक माहितीसाठी 8104322958 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन दै. 'पुढारी' कस्तुरी क्लबतर्फे करण्यात आले आहे.

कोण होणार स्टार प्रवाहची महाराणी?

कार्यक्रमातील मुख्य आकर्षण म्हणजे स्टार प्रवाहची महाराणी ही स्पर्धा आहे. स्पर्धेतील अंतिम विजेत्यांना स्टार प्रवाहची महाराणी किताब पटकावण्याची संधी मिळणार आहे. हा किताब पटकावणार्‍या महिलेस क्राऊन आणि आकर्षक भेटवस्तू मिळणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT