सातारा

सातारा शहरातील दोनजण जिल्ह्यातून तडीपार

Arun Patil

सातारा : सातारा शहर व शाहूपुरी पोलिसांच्या हद्दीत विविध गुन्हे करणार्‍या दोघांना जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी जिल्ह्यातून सहा महिन्याच्या कालावधीसाठी तडीपार केले. ऋतिक जितेंद्र शिंदे (वय 23, रा. गोडोली, ता. सातारा), अक्षय उर्फ बॉम्बे सुनील जाधव (वय 28, रा. बसप्पा पेठ, सातारा) अशी त्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, सातारा शहर व शाहूपुरी पोलिस ठाण्यात ऋतिक शिंदे आणि अक्षय उर्फ बॉम्बे जाधव यांच्या विरोधात गर्दी, मारामारी, आदेशाचा भंग, दुखापत करणे, शिवीगाळ करून दमदाटी, अपहरण करणे, दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न करणे असे गुन्हे दाखल होते. सातारा शहर पोलिसांनी त्यांच्या विरोधात तडीपारीचा प्रस्ताव तयार केला.

तत्पूर्वी संबंधित दोघांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करुन वेळोवेळी सुधारण्याची संधी देऊनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्यांचा सर्वसामान्य नागरिकांना उपद्रव होत होता. यामुळे त्यांच्याकडून हिंसक घटना घडून दहशतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी सातारा जिल्ह्यातून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी तडीपार केले आहे.

SCROLL FOR NEXT