सातारा

सातारा : विहेतील अपघातग्रस्त जीप चालकाचा मृतदेह सापडला

दिनेश चोरगे

मारूल हवेली; पुढारी वृत्तसेवा :  कराड-पाटण राज्यमार्गावरील विहे येथे क्रूझर जीप विहिरीत पडून झालेल्या अपघातातील चालकाचा मृतदेह बुधवारी सकाळी सापडला. जीप चालक मल्हारपेठ (ता. पाटण) येथील असून पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला आहे. दरम्यान, अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून मल्हारपेठ पोलिस तपास करीत आहेत.

संभाजी कृष्णा पवार (वय 50) असे अपघातात मृत्यू झालेल्या जीपचालकाचे नाव आहे. मंगळवारी संध्याकाळी विहेहून मल्हारपेठला येत असताना क्रूझर जीप विहे जवळील विहिरीत कोसळली होती. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने बचाव कार्य सुरू केले होते. क्रेनच्या सहाय्याने जीप बाहेर काढल्यानंतर जीपमध्ये कोणी आढळले नव्हते. रात्रीची वेळ त्यात पाऊस सुरू असल्याने उशिरा रात्री बचाव कार्य थांबविले होते. पोलिसांनी दुसर्‍या दिवशी बुधवारी सकाळी पुन्हा बचाव कार्य सुरू केले. यावेळी संभाजी पवार यांचा मृतदेह आढळला.

रस्त्याकडेच्या विहिरी धोकादायक

कराड-पाटण मार्गावरील विहे व निसरे विहीर या ठिकाणावरील विहिरी धोकादायक स्थितीत आहेत. विहिरींना संरक्षक कठडे नसून सुरक्षेच्या द़ृष्टीने कुठल्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. यापूर्वीही येथे अपघात झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे संबंधितांकडून खबरदारी घेतली जावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT