सातारा

सातारा : लग्नाच्या आमिषाने महिलेवर अत्याचार

Arun Patil

सातारा /पाचगणी ; पुढारी वृत्तसेवा : एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून संबंधित महिला गरोदर राहिल्याने गर्भपात करून फसवल्याप्रकरणी मुंबई येथील युवकावर गुन्हा दाखल झाला आहे. समीर शामराव पाटील (वय 29, रा. जोगेश्वरी पूर्व मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी तीस वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संशयित आरोपी समीर पाटील याने दि. 18 मे 2018 पासून जानेवारी 2022 या कालावधीत फिर्यादी महिलेला लग्नाचे खोटे आमिष दाखवून पाचगणी, मनोरी मालाड, बावधन (मोशी पुणे) येथे तिच्याशी वारंवार शारिरीक संबंध ठेवले. त्यामुळे संबंधित महिला गरोदर राहिली. त्यानंतर तिचा गर्भपात करण्यात आला.

या महिलेने समीर याला वारंवार लग्नाबाबत विचारले असता त्याने शिवीगाळ करून या महिलेस बघून घेतो, अशी धमकी दिली. यावरून समीर पाटील याने आपली फसवणूक केली असल्याचे लक्षात येताच या महिलेने मेघवाडी (मुंबई) पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. हा गुन्हा पाचगणी पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक महामुलकर करत आहेत.

SCROLL FOR NEXT