आसले ः ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या अनोख्या उपक्रमात सहभागी झालेले अधिकारी व शेतकरी.  
सातारा

सातारा : ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’

Shambhuraj Pachindre

कवठे : पुढारी वृत्तसेवा आसले (ता. वाई) येथे 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत आत्मा व स्मार्ट प्रकल्प कृषी आयुक्तालय पुणेचे संचालक दशरथ तांबाळे यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.

महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत विविध कार्यकारी सहकारी सोसायटी आसले येथे हा उपक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत गोरड, सरपंच सौ सुप्रभा चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे यांनी या उपक्रमाची माहिती यावेळी सादर केली. 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व इतर तालुका स्तरीय
अधिकारी व कृषी विभागाच्या अधिकारी यांनी तीन दिवस व महसूल ग्रामविकास व इतर अधिकार्‍यांनी महिन्यातून एक दिवस गावांना भेटी द्याव्यात, असे यावेळी संचालकांनी सांगितले.

दशरथ तांबाळे यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी शेतकर्‍यांना येणार्‍या अडचणी समजून घेतल्या. यामध्ये प्रामुख्याने ड्रोन द्वारे फवारणी, सोयाबीन ग्राम बीजोत्पादन करणार्‍या शेतकर्‍यांसाठी साठवणुकीसाठी गोडावूनसाठी योजना तयार करणे, शेती निविष्ठांवर खत औषधांवर असणार्‍या एमआरपी व विक्री किंमत यामधील तफावत, फळबाग लागवड मधील झाडांची संख्या वाढवणे, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगासाठी सोलर युनिटचाही अनुदानात समावेश करणे, महाडीबीटी पोर्टलवर शेतकर्‍यांना वाढीव कालावधी मिळणे, पशुधन पालकांसाठी असलेली योजना कृषी विभागाकडे वर्ग करणे, तसेच आत्मा अंतर्गत ऊस व हळद पिकासाठी बीज प्रक्रिया करण्यासाठी बेड(बीज प्रक्रिया किट) उपलब्ध होणे याबाबतच्या अडचणी शेतकर्‍यांनी सांगितल्या.

कार्यक्रमास शहाजी वाघ, राजेंद्र डोईफोडे, विजय गायकवाड, सचिन पवार, विलास भुसारे, परशुराम गवळी, प्रदीप देवरे, बी टी एम, योगेश जायकर, अनिल चव्हाण, वीरसिंह शिंदे उपस्थित होते. सूत्रसंचालन तानाजी यमगर व आभार प्रदर्शन हणमंत वाघ यांनी
केले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT