सातारा

सातारा : भाडळेत वीज पडून शेतकर्‍याचा मृत्यू

दिनेश चोरगे

कोरेगाव; पुढारी वृत्तसेवा :  भाडळे (ता. कोरेगाव) येथे काळवट नावाच्या शेत शिवारात सोमवारी दुपारी वीज पडून संभाजी सीताराम निकम (वय 60) या शेतकर्‍याचा मृत्यू झाला. कोरेगाव तालुक्यात सोमवारी दुपारी जोरदार पाऊस कोसळला. दुपारी 4 च्या सुमारास भाडळे गावात वीज कोसळल्याचा आवाज नागरिकांना आला. मात्र, वीज नेमकी कुठे पडली हे कोणालाच माहिती होत नव्हते.

पाऊस थांबल्यानंतर काळवट नावाच्या शिवारात संभाजी निकम यांचा मृतदेह नागरिकांना दिसून आला. या घटनेची माहिती वाठार पोलिस स्टेशनमध्ये देण्यात आली आहे. संभाजी निकम यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले.
त्यांच्या पश्‍चात पत्नी, विवाहित मुलगी असा परिवार आहे. दरम्यान, आ. महेश शिंदे यांना ही घटना समजल्यानंतर निकम कुटूंबियांना प्रशासकीय मदत मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले. प्रशासकीय अधिकार्‍यांना याची माहिती देत मदत मिळावी, यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना आ. शिंदे यांनी दिल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT