‘पुढारी एज्यु दिशा’मुळे प्रवेशाचा मार्ग सोपा 
सातारा

सातारा : ‘पुढारी एज्यु दिशा’मुळे प्रवेशाचा मार्ग सोपा

backup backup

सातारा : पुढारी वृत्तसेवा विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा देण्यासाठी दै. 'पुढारी' आयोजित व संजय घोडावत युनिर्व्हसिटी प्रस्तुत 'पुढारी एज्यु दिशा 2022' हे प्रदर्शन चांगलेच बहरात आले आहे. विद्यार्थी व पालकांचा प्रचंड ओघ सुरु असून आज रविवारी या प्रदर्शनाचा समारोप होणार आहे. सलग दोन दिवस झालेल्या प्रचंड गर्दीमुळे अवघे पोलिस करमणूक केंद्र विद्यार्थ्यांनी फुलून गेले आहे. हे प्रदर्शन करिअरसाठी अत्यंत उपयुक्त व दिशादर्शक असल्यामुळे पुढील शैक्षणिक प्रवेशाचा मार्ग सोपा झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

दै. 'पुढारी' आयोजित व संजय घोडावत युनिर्व्हसिटी प्रस्तुत 'एज्यु दिशा 2022' या शैक्षणिक प्रदर्शनाचे दि. 3 ते 5 जून या कालावधीत येथील अलंकार हॉल, पोलिस करमणूक केंद्र सातारा येथे आयोजन करण्यात आले आहे. पॉवर्ड बाय स्पॉन्सर आयआयबी – पीसीबी लातूर हे आहेत. सहयोगी प्रायोजक एमआयटी-एडीटी युनिर्व्हसिटी, पुणे व प्रा. मोटेगावकर सरांचे आरसीसी क्लासेस लातूर आहेत. अजिंक्य डी.वाय.पाटील युनिर्व्हसिटी, पुणे व सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिर्व्हसिटी, पुणे हे सहप्रायोजक आहेत.

शुक्रवारी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते या प्रदर्शनाचा शानदार प्रारंभ झाला. त्यानंतर दोन दिवस विद्यार्थी व पालकांनी तोबा गर्दी केली. या दोन्ही दिवशी विविध तज्ञांनी मार्गदर्शन, करिअर गाईडन्स मार्गदर्शनाचा लाभ घेतला. प्रत्येक वक्त्याचे मार्गदर्शन मिळावे, यासाठी सकाळपासून पोलिस करमणूक केंद्रात गर्दी झाली होती. मार्गदर्शनादरम्यान विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे निरसनही वक्ते करत असल्याने विद्यार्थी एकाग्र होवून लक्ष देत होते. प्रत्येक वक्त्याच्या मार्गदर्शनाला गर्दी होत होती. विविध शैक्षणिक संस्थांच्या स्टॉलला भेटी देवून विद्यार्थ्यांसह पालक संबंधित कॉलेजमधील विविध उपक्रम, शैक्षणिक फी आदींची माहिती घेत होते. आज रविवार दि. 5 रोजी पुढारी एज्यु दिशा प्रदर्शनाचा सायंकाळी समारोप होत असून तज्ञ वक्त्यांकडून विविध विषयांवर मोलाचे व उपयुक्त मार्गदर्शन केले जाणार आहे.

प्रदर्शनातील आजची व्याख्याने

11 ते 12 वा. : एव्हिएशन व स्पेस इंजिनिअरिंगमधील करिअर (प्रा. अंशुल शर्मा)
12 ते 1 वा. : इंजिनिअरिंग व फार्मसीमधील उभरत्या करिअरच्या संधी
(प्रा. राजीव सिन्हारे), (प्रा. विष्णू चौधरी)
5 ते 6 वा. : छएएढ ची तयारी कशी करावी(प्रा. चिराग सेनमा)
6 ते 7 वा. : छएएढ/गएए परीक्षेबाबत मार्गदर्शन
(प्रा. एम. के. कुरणे)

प्रदर्शनातून मिळतेय उपयुक्त माहिती व दिशा…

तज्ञ वक्त्यांकडून मिळालेली माहिती व विविध स्टॉल्सच्या माध्यमातून मिळालेली करिअर व प्रवेशांसंदर्भातील महत्वपूर्ण माहिती यामुळे 'पुढारी एज्यु दिशा' प्रदर्शनात येताना टेन्शनमध्ये असलेले विद्यार्थी व पालक बाहेर पडताना मात्र प्रसन्न चेहर्‍यानेच जात होते. एकप्रकारे या प्रदर्शनातून त्यांची अपेक्षापूर्ती होवून त्यांच्या करिअरला नवी दिशा अन् नवी उमेद मिळाल्याचे जाणवत होते. खर्‍या अर्थाने मोलाची माहिती, मार्गदर्शन व दिशा या प्रदर्शनातून मिळत असून संभ्रमावस्थेचे वातावरण दूर होत असल्याचे सांगताना अनेकांनी 'पुढारी'ला धन्यवाद दिले.

सहभागी संस्था –

* संजय घोडावत युनिव्हर्सिटी कोल्हापूर,* एम.आय.टी.- ए.डी.टी. युनिव्हर्सिटी पुणे, * आय.आय.बी.-पी.सी.बी. नांदेड लातूर पुणे,
* प्रा. मोटेगावकर सरांचे आर.सी.सी. लातूर, *सिम्बायोसिस स्किल्स अ‍ॅण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पुणे, * के. के. वाघ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नाशिक, * यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ सातारा, * दिशा अ‍ॅकॅडमी वाई, * विश्वकर्मा युनिव्हर्सिटी पुणे, * ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटी पुणे, * सर आईस्टाईन अ‍ॅकॅडमी सातारा, * एम.आय.टी.-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे, * सूर्यदत्ता ग्रुप ऑन इन्स्टिट्यूट पुणे, * इन्फिनिटी अ‍ॅनिमेशन अ‍ॅण्ड व्ही. एफ. एक्स इन्स्टिट्यूट, * चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशन, * क्रेझी क्रिएशन अ‍ॅनिमेशन इन्स्टिट्यूट सातारा, * नरकेज पन्हाळा पब्लिक स्कूल कोल्हापूर, * एम.सी.ई. एफज् – मगरपट्टा इन्स्टिट्यूट ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट पुणे, * शास्त्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन पुणे, * अजिंक्य डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी पुणे, * राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी इस्लामपूर, * फ्युचर डॉक्टर एज्युकेशन सर्व्हिसेस नाशिक, * कार्व्हर एव्हिएशन, * फॉकसेन एज्युकेटर्स सातारा, * फ्रेमबॉक्स प्रिमियर अ‍ॅकॅडमी फॉर मेडिया अ‍ॅण्ड क्रिएटिव्ह आर्टस् .* फॉक्सन एज्युकेटर्स स्ट्रीव्ह फॉर एक्सलेन्स, * मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT