सातारा

सातारा : पांचवड बाजारात बकरी खरेदीसाठी झुंबड (व्हिडीओ)

मोहन कारंडे

भुईंज; पुढारी वृत्तसेवा : आखाडी यात्रा व अमावस्येच्या पार्श्वभूमीवर पांचवड येथील शेळ्या मेंढ्यांच्या बाजारात आज (मंगळवार) बकरी खरेदीसाठी झुंबड उडाली. मागणी वाढल्याने दरही वाढले आहेत. सकाळपासूनच बकरी व कोंबडी खरेदी व विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांची वर्दळ वाढली.

पांचवड (ता. वाई) येथील मंगळवारी भरणारा जनावरांचा आठवडी बाजार पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. जावळी, खंडळा, सातारा, कोरेगाव व वाई या तालुक्यातील शेतकरी पशुधन खरेदी-विक्रीसाठी नेहमीच येथे गर्दी करत असतात. दरवर्षी आखाडी अमावास्येला गावोगावी शिवारातील व भावकींमध्ये यात्रा होत असतात. ही अमावास्या येत्या गुरुवारी व शुक्रवारी असल्याने बकरी व कोंबडी खरेदीसाठी आज (मंगळवारी) पांचवड येथे गर्दी झाली. बाजारात एका बकऱ्याची किंमत कमीत कमी 5 हजार रुपयांच्यावर तर व कोंबडे सुमारे 500 रुपये किंमतीने विकले जात होते.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT