सातारा

सातारा : ‘तो’ सर्व्हे बनकर कंपनीने केला का? आ. शिवेंद्रराजेंचा खा.उदयनराजेंना प्रश्न

मोहन कारंडे

सातारा : पुढारी वृत्तसेवा : ग्रेडसेपरेटरचा सर्व्हे तज्ञांकडून केला असे सांगून 56 टक्के लोक यातून जातात, असे सांगितले जात आहे. मग हा सर्व्हे बनकर आणि कंपनीने केला आहे का? असा प्रश्न उपस्थित करून माझ्या बुद्धीची कीव करण्यापेक्षा काम चुकलंय हे मान्य करा, असा टोला आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी खा. उदयनराजेंना लगावला आहे. सुरुची या निवासस्थानी आ. शिवेंद्रराजेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

आ. शिवेंद्रराजे म्हणाले, ग्रेडसेपरेटर करण्यापूर्वी तज्ञांकडून सर्व्हे झालाय हे ठिक आहे. पण सातारकरांचे म्हणणे खासदारांनी लक्षात घेतले पाहिजे. नागरिकांना वापरण्यासाठी त्यांचा उपयोग व्हायला पाहिजे होता. किती लोक यातून जातात? खासदारांनी 56 टक्केलोक जातात असे सांगितले आहे. मग हा सर्व्हे कोणी केला. त्यांचे समर्थक बनकर हे पोवईनाक्यावरच ठाण मांडून बसलेले असतात. त्यामुळे बनकर आणि कंपनीने सर्व्हे केला का? असा खोचक प्रश्न उपस्थित करून त्यांनी सर्व्हे कंपनी काढली का?, असेही आ. शिवेंद्रराजे म्हणाले. माझ्या बुध्दीची कीव करण्यापेक्षा काम चुकलेले आहे. लोकांचा पैसा वाया गेला आहे, त्यामुळे त्यात सुधारणा करावी. संपूर्ण चुकीचे होऊनही खासदारांना याबाबत काहीही ऐकायचे नाही. मी फार ग्रेट आहे, असाच त्यांना स्वतःचा ढोल वाजवायचा आहे. त्यांना नगरपालिका निवडणुकीत काय ते समजेल, असा इशाराही त्यांनी दिला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT