उंब्रज : उंब्रज (ता. कराड) येथे सर्व्हिस रस्त्यावर रस्ता ओलांडणाऱ्या पंचेचाळीस वर्षीय पादचारी महिलेला ट्रकची धडक बसल्याने महिलेच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने महिला जागीच ठार झाली आहे. सदरची घटना सोमवार दि. ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास घडली. घटनास्थळावरून ट्रक चालकाने पोबारा केला असून, सायंकाळी उशीरापर्यंत मृत महिलेची ओळख पटू शकली नाही.
सोमवार हा उंब्रजचा आठवडा बाजारचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी होती. सायंकाळी सहाच्या सुमारास पादचारी महिला सर्व्हिस रस्ता ओलांडत असताना सर्व्हिस रस्त्यावरून कराड दिशेकडे जाणाऱ्या ट्रकची पादचारी महिलेस धडक बसली. यामध्ये ट्रकचे चाक महिलेच्या डोक्यावरून गेल्याने पादचारी महिला जागीच ठार झाली.
घटनास्थळी नागरिक व पोलिसांनी धाव घेतली. घटनास्थळावरून ट्रक चालकाने पोबारा केला. रात्री उशीरापर्यंत मृत महिलेची ओळख पटू शकली नाही.