सातारा

सातारा : झी मराठीच्या कलाकारांसह कस्तुरींनी धरला ठेका

मोहन कारंडे

कराड; पुढारी वृत्तसेवा : मनाला भावनारी सुमधूर गाणी, ठेका धरायला लावणारा ताल, मन मोहून टाकणारा आवाज आणि झी मराठी फेम 'अप्पी आमची कलेक्टर'या मालिकेतील शिवानी नाईक (अप्पी), रोहित परशुराम (अर्जुन) यांच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा यामुळे महिलांमध्ये चैतन्य पसरले. तिळगुळाच्या गोडव्याबरोबरच गाणी, नृत्य आणि कलाकारांच्या गमती-जमतींमध्ये महिला हरकून केल्या.

निमित्त होते मकर संक्रांतीनिमित्त दै.'पुढारी' कस्तुरी क्लब आणि झी मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि शिवाजी आप्पा सराफ अँड सन्स यांच्या मुख्य प्रायोजकत्वासह कस्तुरींसाठी कराडमध्ये शताब्दी हॉल अर्बन बँक येथे झी मराठी उत्सव नात्यांचा हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन. यावेळी झी मराठीच्या कलाकारांसोबत गप्पा, धमाल, किस्से आणि हळदीकुंकू समारंभसह वाण वाटप असा दुहेरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वाण वाटप प्रायोजक म्हणून वेदांत ड्राय फ्रूट आणि मसाले, सुवर्णसाज फॉर्मिंग ज्वेलर्स आणि शाही फूड यांचे सहकार्य लाभले.
यावेळी झी मराठी फेम अप्पी आमची कलेक्टर या मालिकेतील शिवानी नाईक (अप्पी), रोहित परशुराम (अर्जुन) यांच्याशी गप्पा खेळ व शूटिंग दरम्यान होत असलेल्या गमती जमती प्रत्यक्ष कलाकारांच्या तोंडून ऐकण्याची संधी महिलांना मिळाली. तसेच झी मराठीच्या गायक आणि कलाकारांनी सादर केलेल्या गाण्यांवर महिलांनी शिट्या वाजवत, वन्स मोअरचा आग्रह करत डान्स करत धम्माल केली.

सध्या कस्तुरी क्लब सभासद नोंदणी उत्साहात सुरु असून नोंदणीसोबत शहर आणि परिसरातील महिला व युवतींना हमखास गिफ्ट व भरपूर सवलत कूपन्सचा लाभ मिळणार आहे. याशिवाय सभासद महिलांसाठी वर्षभर विविध कार्यक्रमांच्या मेजवानीसह भरघोस बक्षिसे जिंकण्याची संधी यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे. नोंदणीसाठी 600 रुपये हे नाममात्र शुल्क आकारले जाणार असून, नोंदणीवेळी लगेचच आकर्षक बॉस कंपनीचा स्टेनलेस स्टील कॉपर कोटिंग थर्मास हे हमखास गिफ्ट महिलांना देण्यात येणार आहे. नावनोंदणीसाठी पुढारी भवन, लाहोटी प्लाझा, पोपटभाई पेट्रोलपंपासमोर, कराड येथे किंवा 02164 – 222392, 8433830741 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा.

कलाकारांच्या हस्ते लकी ड्रॉचे बक्षीस

कार्यक्रमामध्ये 3 लकी ड्रॉ काढण्यात आल्याने महिला खूश झाल्या. शिवाजी आप्पा सराफ अँड सन्स यांच्याकडून लकी ड्रॉ मध्ये देण्यात आलेली सोन्याची नथ तब्बसूम कागदी यांनी पटकावली. तर वैशाली घाडगे आणि संगीता शहा यांनी सूर्या गॅसची शेगडी 'लकी ड्रॉ'मध्ये जिंकली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT