सातारा

सातारा : जिल्ह्यात 10 ग्रा.पं.साठी 4 ऑगस्टला मतदान

सोनाली जाधव

सातारा : पुढारी वृत्‍तसेवा
जिल्ह्यातील कराड तालुक्यातील 9 तसेच फलटण तालुक्यातील एका ग्रामपंचायतीसाठी 4 ऑगस्टला मतदान होणार आहे. 12 जुलैपासून नामनिर्देशपत्र सादर करता येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम बुधवारी जाहीर केला.
जानेवारी 2021 ते मे 2022 या कालावधीत मुदत संपलेल्या व जून 2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींच्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणक प्रणालीद्वारे राबवण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये कराड तालुक्यातील उत्‍तर कोपर्डे, आदर्शनगर, शितळवाडी, पश्‍चिम उंब्रज, कोयना वसाहत, बेलवडी, उत्‍तर तांबवे, नाणेगाव बुद्रुक या 9 ग्रामपंचायती तसेच फलटण तालुक्यातील परहर बुद्रुक या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या 10 ग्रामपंचायतींची निवडणूक संगणक प्रणालीद्वारे होणार आहे. 5 जुलैला तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करणार आहेत. 12 जुलै ते 19 जुलै या कालावधीत (सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत इच्छुकांना नामनिर्देशपत्र सादर करता येणार आहे. त्यानंतर 20 जुलै दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.

22 जुलै दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढवणार्‍या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. 4 ऑगस्टला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान होणार आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या मान्यतेने तहसीलदारांनी निश्‍चित केलल्या ठिकाणी 5 ऑगस्टलाा मतमोजणी होणार आहे.

SCROLL FOR NEXT