सातारा

सातारा : ग्रामीण भागातही मोबाईल, दुचाकी चोरीच्या घटना

अनुराधा कोरवी

कण्हेर : पुढारी वृत्तसेवा : शहराप्रमाणेच आता सातारा तालुक्यातील कण्हेरसह ग्रामीण भागात मोबाईल, दुचाकी आणि महागड्या वस्तू चोरीस जावू लागल्या आहेत. काही युवकांमध्ये गुन्हेगारी वृत्तीची मानसिकता बळावत असल्याने अनेकजण लहान मोठे गुन्हे करताना दिसत आहेत. त्यामुळे अनेकजण गुन्हेगारीच्या खाईत ओढले जात आहेत.

एकीकडे हायटेक जीवन जगण्याची लालसा आणि दुसरीकडे लाईफ स्टाईल मेन्टेन करण्यासाठी अपुऱ्या असलेल्या पैशामुळे काहीजण चुकीच्या मार्गाला जावू लागले आहेत. चुकीच्या मार्गाने पैसे कमावण्यात काही तरुण गुंतले असल्याचे भीषण वास्तव सातारा तालुक्यातील कण्हेरसह ग्रामीण भागात दिसत आहे. केवळ लालसेमुळे बहुतांश तरुण वर्ग गुन्हेगारीकडे वळत आहे. मात्र, या प्रकारामुळे अनेक तरुण गुन्हेगारीत अडकले आहेत. ही बाब ग्रामीण भागातील घडलेल्या चोरीच्या घटनांमधून प्रकर्षाने समोर येत आहे.

अनेकांना हायटेक, लाईफ जगण्याची हौस असते. मात्र, हाताला काम मिळत नसल्याने अनेकजण आर्थिक विवंचनेत सापडतात. ही विवंचना अनेकांना वाममार्गाला नेऊन गुन्हा करण्यास कारणीभूत ठरत आहे. काहीशी पैशांसाठी आहेत. अनेकजण चोरी, घरफोडी, मोबाईल व दुचाकी चोरून वर्षभरापूर्वी कण्हेर परिसरात चार ठिकाणी झालेल्या चोरीमध्ये घरे व दुकाने फोडताना सीसीटीव्हीमध्ये आढळून आलेले चारही संशयित तरुणच असल्याचे दिसून येत होते. कमी वेळात ज्यादा पैसा मिळवून झटपट श्रीमंत होण्याची लालसा अगदी त्यांच्या जिवावर बेतू शकते हे वाममार्गाला नेऊन सिद्ध झाले आहे. एवढेच नव्हे तर बहुतांश ग्रामीण भागात तरुण जुगार, मटका आणि अगदी कॅसिनो खेळून पैसे कमावण्यात गुंतले आहेत.

अनेकांनी शेती, घर विकण्याचे पाऊल उचलले आहे. तर नेतात अलीकडच्या सोशल मीडियामधील लाईफ स्टाईलमुळे युवक व्यसन पूर्ण करण्यासाठी वाममार्गाला लागले आहेत. ही बाब पालकवर्गासाठी चिंताजनक बनली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT