महाबळेश्वर : पुढारी वृत्तसेवा : महाबळेश्वरपासून अंदाजे सहा किमी अंतरावर असलेल्या क्षेत्र महाबळेश्वर परिसरातील एका खासगी बंगल्याच्या अंदाजे वीस फूट खोल कोरड्या विहिरीत गुरुवारी रात्रीच्या सुमारास एक रानगवा पडला. हा रानगवा गंभीर जखमी झाला आहे. याबाबतची माहिती वनविभागास देण्यात आली. शुक्रवारी सकाळी वनविभागाची टीम दाखल होत घटनेची माहिती घेतली.
गव्याला बाहेर काढण्यासाठी महाबळेश्वर ट्रेकर्स व प्रतापगड रेस्क्यू टीमसह पालिका जेएसबी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र वनविभागाने पुणे येथील तज्ज्ञांच्या रेस्क्यू टीमला संपर्क साधला आहे. गुरुवारी पाण्याच्या शोधात हा गवा विहिरीत पडला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.