सातारा

सातारा : केळवली धबधबा फेसाळू लागला; डोंगररांगांवर रिमझिम पाऊस

दिनेश चोरगे

परळी; पुढारी वृत्तसेवा : सातार्‍याच्या पश्चिमेकडील परळी खोर्‍यात असलेला केळवली धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. कधी रिमझिम पाऊस तर कधी दाट धुके अशा आल्हाददायक वातावरणामुळे केळवली धबधबा व परिसर पर्यटकांना आकर्षित करु लागला आहे.

सातारा तालुक्यातील परळी खोर्‍यातील केळवली धबधबा हा पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. या ठिकाणी असणारा निसर्ग तसेच टप्प्या-टप्प्याने कोसळणारा हा धबधबा निसर्गप्रेमींना साद घालत असतो. यावर्षी पावसाने ओढ दिल्याने आतापर्यंत हा धबधबा वाहत नव्हता. मात्र गेल्या आठवडाभरापासून या परिसरात पावसाची रिमझिम सुरू असल्याने या धबधब्याने आता कोसळायला सुरुवात केली आहे. त्यामुळे हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची पावले या परिसरात पडू लागली आहेत.

परळी परिसर निसर्ग सौंदर्याची खाण

सातारा शहरातून बोगद्यातून बाहेर आल्यावर परळीतून पुढे नित्रळ व केळवली असा धबधब्याला जाण्याचा मार्ग आहे. परळी येथूनच एका बाजूला सज्जनगड व समोर दिसणारे केळवली सांडवलीचे विस्तीर्ण पठार त्याचबरोबर उजव्या बाजूला उरमोडी जलाशय असा हा निसर्गाचा अदभूत नजराणा पहायला मिळतो. त्यामुळे आपोआपच या परिसराकडे पयर्र्टकांचे लक्ष वेधले जाते. या परिसरात विविध पशुपक्षी तसेच अनेक औषधी वनस्पती व भात शेतीची खाचरे असल्यामुळे हा परिसर निसर्ग सौंदर्याची खाणच आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT