सातारा

सातारा : कान्हरवाडी येथील मंदिरात चोरी

अनुराधा कोरवी

मायणी : पुढारी वृत्तसेवा : कान्हरवाडी, ता. खटाव येथील श्री. सद्गुरु सिध्दानंद स्वामी मंदिराचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील स्वामींच्या मूर्तीचे चांदीचे टोप, छत्री व पादुका असा ३२ हजार ४०० रुपयांचा ऐवज लंपास केला. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेची मायणी पोलिस दूरक्षेत्रात प्रकाश सुखदेव यलमर यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास कारंडे करत आहेत.

SCROLL FOR NEXT