सातारा

व्यवस्थापन शिक्षणात करिअरच्या अनेक संधी : प्रा. रणधीरसिंह मोहिते

अविनाश सुतार

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सध्या व्यवस्थापन शिक्षणाला विशेष महत्व असून त्यात करिअरच्या अनेक संधी दडल्या आहेत. विद्यार्थ्यांनी कौशल्य विकासावर आधारित शिक्षण घ्यावे, असे आवाहन यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ साताराचे प्रा. रणधीरसिंह मोहिते यांनी केले.

दै. 'पुढारी' आयोजित व संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत एज्युदिशा 2022 या शैक्षणिक प्रदर्शनात विद्यार्थी व पालकांना 'व्यवस्थापन शिक्षण व करिअर संधी' या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

प्रा. मोहिते म्हणाले, एमबीए म्हणजेच व्यवस्थापन शिक्षण. आज जागतिकीकरणाने शिक्षण व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलला असून सध्या तंत्रशिक्षणाकडे वाटचाल सुरु आहे.आज विद्यार्थ्यांमधील निपुणता व व्यक्तीमत्व विकासाला महत्व आले आहे. शिक्षण, प्रशिक्षण व कौशल्य विकास अशी अभ्यासाची त्रिसुत्री अवलंबली जात आहे. करिअरपूरक शैक्षणिक प्रवेशासाठी युनिव्हर्सिटी निवडताना विशेष काळजी घ्यावी. आपण वयाच्या कोणत्या टप्प्यात अ‍ॅडमिशन घेत आहोत त्यानुसार प्रवेश परीक्षेची तयारी करणे, कॉलेजचा मागील कट ऑफ पाहणे, तेथील शैक्षणिक वातावरण, तज्ञ शिक्षक, कौशल्य वाढीसाठी होणारे प्रयत्न, व्यक्तीमत्व विकासावर भर दिला जातो का, इंटर्नशीपची सोय व साधने, लायब्ररी आदि गोष्टींची पुरेशी माहिती घ्यावी, असे आवाहन प्रा. रणधीरसिंह मोहिते यांनी केले.

SCROLL FOR NEXT