सातारा

वडूज मुख्याधिकार्‍यांविरोधात उपोषणाचा इशारा

backup backup

वडूज : पुढारी वृतसेवा वडूज शहरातील नागरीकांना व महिला पदाधिकार्‍यांना अरेरावीची भाषा वापरत शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याच्या धमक्या देऊन दहशतीचे वातावरण निर्माण करणार्‍या वडूज नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांच्याविरोधात सोमवार दि. 22 ऑगस्टपासून बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा अभेद्य सामाजिक संघनेनेसह विविध सामाजिक संघटनांनी निवेदनाद्वारे तहसीलदार किरण जमदाडे यांना दिला.

वडूज नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांनी कारभाराची सूत्रे हाती घेतल्यापासून नागरिकांसह आजी-माजी पदाधिकारी यांना अरेरावी व गुन्हा दाखल करण्याची भाषा वापरत विनाकारण वेठीस धरले आहे. त्यांच्यावर तत्काळ कारवाई व्हावी, अन्यथा सोमवार दि. 22 ऑगस्टपासून बेमुदत उपोषणाला बसू, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी अभेद सामाजिक संघटनेचे अध्यक्ष डाॅ. संतोष गोडसे, उपाध्यक्ष विजय शिंदे, प्रवीण जाधव, रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष राजेंद्र जगताप, राजेंद्र माने, मनसेचे जिल्हा संघटक सुरज लोहार, योगेश जाधव, गजानन निकम उपस्थित होते.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT