सातारा

रानगव्याकडून आटाळीत भाताची रोपे भुईसपाट

backup backup

बामणोली : पुढारी वृत्तसेवा आटाळी, ता. सातारा येथील शेतकर्‍यांच्या भात रोपांची रानगव्यांकडून नासधूस करण्यात आली असून भाताची रोपे भुईसपाट झाली आहेत. त्यामुळे या परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त आहे. पावसाळ्यामध्ये भाताची लागवड करण्यासाठी तरवे भाजून भाताची रोपे तयार केली जातात. त्यानंतर पावसाला सुरुवात होताच वावरांमध्ये चिखल करून ही रोपे त्यात लावली जातात.

मात्र, आटाळी व परिसरामध्ये रानगव्यांचे प्रमाण वाढले असून त्यांनी शेतकर्‍यांनी तयार केलेली रोपे खाऊन भुईसपाट केली आहेत. त्यामुळे आता भात लागण कशी करायची? या संकटात येथील शेतकरी सापडला आहे. तरी वन विभागाने तात्काळ घटनास्थळी जाऊन पिकाचा पंचनामा करून शेतकर्‍यांना भरीव मदत करावी. भात लागवड करण्यासाठी रोपांची तजवीजदेखील करून द्यावी, अशी मागणी आटाळीचे उपसरपंच सोमनाथ आटाळे यांनी केली आहे.

SCROLL FOR NEXT