सातारा : पुढारी वृत्तसेवा दै. 'पुढारी' कस्तुरी क्लब व मंडईचा राजा गणेशोत्सव मंडळ यांच्यावतीने बुधवार, दि. 7 रोजी दु.3 ते 7 या वेळेत मंगळागौरीचे खेळ व सामूहिक अथर्वशीर्ष पठण व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच विजेत्यांना आकर्षक़ बक्षिसे व सहभागी सर्व महिलांना एस. के. ब्युटी पार्लरतर्फे हमखास गिफ्ट दिले जाणार आहे.
दै. 'पुढारी' कस्तुरी क्लबतर्फे गणेशोत्सवामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्यापैकीच एक उपक्रम म्हणजे मंगळागौरीचे खेळ व सामूहिक अथर्वशीर्ष पठण होय. यावेळी घेण्यात येणार्या विविध स्पर्धांमध्ये मोदक स्पर्धा, सुंदर माझी पूजेची थाळी, मंडईच्या राजासमोर सुंदर सेल्फी आदींचा समावेश असून सहभागी महिलांना आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे. तसेच सायं. 7 वा. महाआरती घेण्यात येणार आहे. महिला व युवतींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन दै. 'पुढारी' कस्तुरी क्लबच्या वतीने करण्यात आले.
दै.'पुढारी' कस्तुरी क्लबच्या सभासद नोंदणीला दणक्यात सुरुवात झाली असून जिल्हाभरातून महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सभासद होणार्या महिलांना आकर्षक भेटवस्तू मिळणार असून वर्षभर बक्षिसांचा वर्षावही होणार आहे. त्यामुळे सभासद नोंदणीसाठी महिलांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. सभासद नोंदणीसाठी दै.'पुढारी' कार्यालयात स. 11 ते रात्री 6.30 यावेळेत 8104322958 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा