सातारा

मश्वरातील घरफोडी साताऱ्यात ओपन; मोक्कातील संशयितासह तिघांना अटक

अनुराधा कोरवी

सातारा : पुढारी वृत्तसेवा ;  महाबळेश्वर येथे घराचे काम सुरु असताना त्यातील सुमारे दोन लाख रुपयांचे साहित्य चोरुन साताऱ्यात विक्री करण्यासाठी आणले जात असताना पोलिसांनी त्याचा छडा (ओपन) लावला. संशयित तिघांमध्ये एकजण मोक्कासारख्या गुन्हयातील आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पोलिसांनी चोरीतील मुद्देमाल जप्त केला आहे.

प्रवीण चंद्रकांत घाडगे (रा. एरंडल ता. महाबळेश्वर), निकेत वसंत पाटणकर, आकाश ज्ञानेश्वर कापले (दोघे रा. चंदननगर, कोडोली, सातारा) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. यातील निकेत पाटणकर हा मोक्काच्या गुन्ह्यातील संशयित आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, दि. १० जानेवारी रोजी महाबळेश्वर येथून अज्ञात चोरट्यांनी पॉलिकॅब वायर, कटर मशीन, ड्रील मशीन, प्लंबींगचे साहित्य चोरुन नेले होते. याप्रकरणी महाबळेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाचे पथक (एलसीबी) तपास करत होते. दि. १९ रोजी एलसीबी पथकाला साताऱ्यात चोरीचे साहित्य काहीजण विक्री करण्यासाठी आणणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा लावला असता पिकअप चारचाकी वाहनासह तिघांना पकडण्यात आले.

संशयिताकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्यांनी महाबळेश्वर येथे चोरी केलेले साहित्य असल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी चोरीचे साहित्य जप्त करुन संशयितांना अटक केली. पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि अरुण देवकर, संदीप भागवत, सपोनि संतोष पवार, रविंद्र भोरे, फौजदार विश्वास शिंगाडे, अमित पाटील, सहाय्यक फौजदार उत्तम दबडे, तानाजी माने, पोलिस अजित कर्णे, प्रवीण कांबळे, स्वप्नील माने, अमोल माने, प्रवीण पवार, केतन शिंदे, नवनाथ शिंदे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

एलसीबीच्या नव्या टीमची भिरकीट

एलसीबीमध्ये सपोनि संतोष पवार व रविंद्र भोरे तर फौजदार विश्वास शिंगाडे, अमित पाटील हजर झाले आहेत. पवार यांनी यापूर्वी मुंबई, कोल्हापूर एलसीबी, ढेबेवाडी येथे काम केले आहे. ढेबेवाडी येथील बहुचर्चित अंधश्रध्देतून झालेल्या खुनाचा छडा लावण्यात त्यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे. पाटील यांनी याअगोदर सातारा तालुका येथे सेवा बजावली आहे. एलसीबीमध्ये आल्यानंतर त्यांनी अनेक क्लिष्ट व गुंतागुंतीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात सहभाग घेतला आहे. शिंगाडे यांनी यापूर्वी गडचिरोली तर साताऱ्यात वेलफेअर येथे सेवा बजावली आहे. नवे अधिकारी एलसीबीत रुजू झाल्यानंतर त्यांनी कामाची भिरकीट लावत डिटेक्शनचा धडाका सुरु केला आहे..

SCROLL FOR NEXT