सातारा

‘पुढारी’ परिवारावर माझे कायमच प्रेम : खा. उदयनराजे भोसले

दिनेश चोरगे

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी आपल्या वाढदिवस सोहळ्याची सुरुवात 'पुढारी' कार्यालयातून केली. 'पुढारी' कार्यालयात केक कापून त्यांनी वाढदिवस साजरा केला. यावेळी बोलताना त्यांनी माझ्या राजकीय वाटचालीत दै. 'पुढारी'ची मला नेहमीच साथ मिळाल्याचे सांगितले. 'जिल्ह्यात सर्वाधिक खप असलेल्या 'पुढारी'वर माझे कायमच प्रेम असून 'पुढारी'चा खप सर्वाधिक आहेच. तो आणखी वाढेल, मात्र आम्हाला खपवू नका म्हणजे झालं', अशी मिश्कील कोटी खा. उदयनराजेंनी केली.

खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात जल्लोषाचे वातावरण आहे. खा. उदयनराजे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा शहरात माहोल आहे. शुक्रवारी त्यांचा वाढदिवस असतानाच गुरुवारीच त्यांनी दै. 'पुढारी' कार्यालयास आवर्जून भेट दिली. खा. उदयनराजे भोसले यांचे स्वागत विभागीय व्यवस्थापक जीवनधर चव्हाण, वृत्तसंपादक हरीष पाटणे, जाहिरात विभाग प्रमुख मिलिंद भेडसगावकर यांनी केले. यावेळी हरीष पाटणे म्हणाले, सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक खप असलेल्या दै. पुढारी कार्यालयात आपलं स्वागत आहे. 'पुढारी' परिवार आणि तुमचा नेहमीच ऋणानुबंध राहिला आहे. आपल्याला दीर्षायुष्य व उत्तम आरोग्य लाभो, सातारकरांसह आम्हालाही तुमचा सहवास असाच लाभत राहो, तुमचे आमचे प्रेम वृद्धींगत होवो, अशा शब्दांत त्यांनी सदिच्छा व्यक्त केल्या.

खा. श्री. छ. उदयनराजे भोसले म्हणाले, दै. 'पुढारी'वर माझे कायमच प्रेम आहे. 'पुढारी'चा खप सर्वाधिक असून त्यामध्ये आणखी वाढ व्हावी. विनंती एवढीच आहे की, तुमचा खप वाढतच राहील, फक्त आम्हाला खपवू नका म्हणजे झालं, अशी मिश्किल कोटीही त्यांनी केली. उदयनराजेंच्या या मिश्किलीवर 'पुढारी' परिवार खळखळून हसला. यावेळी उदयनराजेंनी 'पुढारी' परिवारातील प्रत्येक सहकार्‍याशी आस्थेवाईकपणे संवाद साधला.

यावेळी जि.प.चे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, काका धुमाळ, प्रीतम कळसकर, अ‍ॅड. विनीत पाटील, तेजस जगताप आणि 'पुढारी' परिवार उपस्थित होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT