सातारा

पाचवडच्या 75 वर्षाच्या वडाचे पुनर्रोपण

backup backup

वाई : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पाचवड, ता. वाई येथे 75 वर्षे जुन्या वडाचे पुनर्रोपण करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम, वनविभाग व सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने ही विधायकता जोपासण्यात आली. सहाय्यक वनसंरक्षक सातारा सुधीर सोनवले, उपविभागीय बांधकाम अधिकारी श्रीपाद जाधव व पर्यावरण प्रेमी यांनी दखल घेऊन वडाच्या झाडाचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. हे वडाचे झाड मंगळवारी रात्री काढण्यात आले. त्याला क्रेनने कंटेनरमध्ये भरून सोनजाईच्या पायथ्याला आणण्यात आले.

यावेळी दोन जेसीबी, एक पोकलँड, ट्रॅक्टर यांच्या मदतीने आठ तासाच्या अथक परिश्रमातून पुनर्रोपण करण्यात आले. यावेळी सोनजाई देवस्थानचे मंगलगिरी महाराज, वनक्षेत्रपाल स्नेहल मगर, वनपाल संग्राम मोरे, सुरेश सूर्यवंशी, पर्यावरण प्रेमी प्रशांत डोंगरे, प्रा. आनंद घोरपडे, पतंजली योग समितीचे धनंजय मलटणे, रामदास राऊत, पी एस भिलारे, यशवंत डेरे, दत्तात्रय डेरे, अपर्णा वाईकर, सुनंदा कट्टे, डॉ सस्मिता जैन, सारिका गवते, सार्वजनिक बांधकाम विभाग वन विभागाचे अधिकारीी-कर्मचारी यांच्यासह पर्यावरण प्रेमी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT