सातारा

ना. रामराजेंनी मानले खा. शरद पवार यांचे आभार

backup backup

सातारा : पुढारी वृत्तसेवा विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे काँग्रेसचे उमेदवार व माजी विधान परिषद सभापती रामराजे ना. निंबाळकर यांनी विजय मिळवला. यानंतर बुधवारी सकाळी रामराजेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची भेट घेवून त्यांचे आभार मानले. यावेळी दोघांमध्ये काही वेळ चर्चाही झाली. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी नुकतीच निवडणूक झाली. यामध्ये भाजपचे 5, राष्ट्रवादी व शिवसेनेचे प्रत्येकी 2 व काँग्रेसचा एक उमेदवार विजयी झाला. यामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे ना. निंबाळकर यांना 28 व एकनाथ खडसे यांनी 29 मते मिळवत विजय मिळवला होता. या विजयानंतर पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील व आ. मकरंद पाटील यांनी त्याच दिवशी मुंबईत रामराजेंची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले होते.

विधान परिषदेचा निकाल झाल्यानंतर लागलीच शिवसेना नेते ना. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने राज्यभरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्‍वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये चलबिचल वाढली असून बैठकांचे सत्र सुरू आहे. याच वातावरणात बुधवारी रामराजेंनी खा. शरद पवार यांची भेट घेत आभार मानले. यावेळी विधान परिषदेची पक्षातर्फे निवडणूक लढवण्यासाठी तिकीट दिले. पक्षाने विश्‍वास टाकून संधी दिली. याबद्दल कृतज्ञता व्यक्‍त केली. पक्षाने टाकलेला विश्‍वास सार्थ ठरवेन, अशी ग्वाही रामराजेंनी दिली. यावेळी शरद पवार यांनीही रामराजेंनी विजय मिळवल्याबद्दल अभिनंदन केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT