सातारा

तीन राज्यांत लहान मुलांवर टोमॅटो फ्लू आजाराचे संकट!

Arun Patil

भुवनेश्वर : वृत्तसंस्था : देशात एक नवा आजार आढळून आला आहे. लक्षणांवरून सर्वसाधारणपणे त्याला टोमॅटो फ्लू म्हटले जात आहे. रुग्णांच्या शरीरावर लाल रंगाची पुळी येते आणि नंतर ती मोठी होत टोमॅटोसारखी लालभडक दिसायला लागते. मोठ्या पुरळच्या लाल रंगामुळे या आजाराला टोमॅटो फ्लू नाव पडले आहे.

तीन राज्यांत या आजाराचे रुग्ण आढळलेले असून, ओडिशात सध्या 26 सक्रिय रुग्ण आहेत. या आजाराबाबत 'लँसेट रेस्पिरेटरी जर्नल'ने एक वृत्तांत प्रसिद्ध केला असून, या वृत्तांतानुसार टोमॅटो फ्लू या आजाराला 'टोमॅटो फिव्हर'ही म्हटले जाऊ शकते. आजाराची लक्षणे 1 ते 5 वर्षांच्या मुलांमध्ये आढळत आहेत. हात, पाय आणि तोंडावर पुरळ आणणारा हा आजार आहे.

दोन महिन्यांपूर्वी 6 मे रोजी केरळमध्ये या आजाराचे रुग्ण आढळले होते. केरळनंतर आता ओडिशामध्येही या आजाराचे रुग्ण आढळत आहेत. लँसेट रेस्पिरेटरी जर्नलच्या वृत्तांतानुसार एकट्या भुवनेश्वरमध्ये 26 मुले या आजाराने संक्रमित आहेत. 6 मे ते 21 ऑगस्ट 2022 पर्यंत हा आजार केरळ, तामिळनाडू आणि ओडिशापर्यंत पसरला आहे. देशभरात टोमॅटो फ्लूचे शंभरावर रुग्ण आढळले असून एकट्या केरळमध्ये 82 रुग्ण आढळले आहेत. देशभराला विशेषत: केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि ओडिशातील जनतेला या आजाराबाबत डॉक्टरांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. या आजारात मुलांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे हा आजार गंभीर मानला जातो.

टोमॅटो फिव्हरची लक्षणे

हा एक व्हायरल फ्लू असून तो बहुतांशी मुलांनाच होतो.
त्वचेत जळजळ होते. तोंड सुकायला लागते, पण तहान लागत नाही.
तोंड, हात, पायावर लाल रंगाची पुरळ उमटते. ती मोठी होत जाते.
ताप, अंगदुखी, अपचन, तोंडात व्रण, हात-गुडघ्यांचा रंग फिका पडतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT