सातारा

कोरेगावातून आषाढी सायकलवारी पंढरपूर कडे रवाना

Shambhuraj Pachindre

कोरेगाव : पुढारी वृत्तसेवा कोरेगावातून आज आषाढी सायकल वारी पंढरपूर कडे रवाना झाली. ही सायकलवारी दोन जुलै रोजी एका दिवसात 140 किलोमीटर अंतर पार करणार आहे. सातारा, उंब्रज, भुईंज, कोरेगाव, यांसह जिल्ह्यातून शेकडो सायकल प्रेमी या आषाढी सायकल वारीत सहभागी झाले आहेत.

सायकल रॅलीला कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांनी वारी म्हणजे चैतन्य, वारी म्हणजे ज्ञान, शक्ती व भक्तीचा त्रिवेणी संगम आहे असे संबोधन करून मार्गदर्शन केले. व स्वतः वारीमध्ये सायकल वरुन कोरेगाव ते पुसेगाव पर्यंत सहभाग नोंदविला. सायकल वापराबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्राच्या विविध भागातून सायकलस्वार पंढरीच्या दिशेने येणार आहेत.

SCROLL FOR NEXT