शुभम दशरथ कांबळे File Photo
सातारा

Pahalgam Terror Attack | स्टेटसला पाकचा झेंडा ठेवणार्‍या युवकास अटक

न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली

पुढारी वृत्तसेवा

Pahalgam Terror Attack

वाई : पाकिस्तानी दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. असे असताना वाई तालुक्यातील एका युवकाने या हत्याकांडाच्या समर्थनार्थ पाकिस्तानचा झेंडा स्टेटसला ठेवून भारताबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केली. याप्रकरणी वाई पोलिसांनी संबंधित युवकावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

शुभम दशरथ कांबळे (वय 23, रा. जांभळी, सध्या रा. नावेचीवाडी गंगापुरी, ता. वाई) असे संशयित युवकाचे नाव आहे. स्टेटस ठेवल्याचे व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी रात्री शुभमला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पहलगामच्या घटनेमुळे वातावरण संतप्त झाले असतानाच शुभम कांबळे या युवकाने सोशल मीडियावर पाकिस्तान समर्थनार्थ स्टेटस ठेवले. तसेच या पोस्टमध्ये त्याने भारतीयांच्या भावना दुखावतील असा आक्षेपार्ह मजकूर ठेवला. हा स्टेटस व्हायरल झाल्यानंतर पश्चिम भागातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. तसेच याबाबत संकेत सुरेश चिकणे यांनी फिर्याद दिली. यानंतर स्टेटसची खातरजमा करून वाई पोलिसांनी शुभम कांबळे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

शुभम हा मूळचा जांभळीचा असला तरी तो वाईत गंगापूर येथे राहत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शुभमला पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर सामाजिक भावना दुखावल्याबद्दल कारवाई करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT