सातारा

Whagh Nakhe : वाघनखे 17 नोव्हेंबरला सातार्‍यात

दिनेश चोरगे

सातारा :  हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांनी किल्ले प्रतापगडावर अफजलखानाचा कोथळा वाघनख्यांद्वारे बाहेर काढला होता. त्यांची ही ऐतिहासिक वाघनखे नोव्हेंबरमध्ये लंडनच्या म्युझियममधून भारतात आणण्यात येणार आहेत. ही वाघनखे 3 वर्षे आपल्या देशात राहणार आहेत. पहिल्यांदा दि. 17 नोव्हेंबर रोजी सातार्‍यात येणार असून, येथे ती वर्षभर छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवली जाणार आहेत. त्यानंतर कोल्हापूर व नागपूर येथेही इतिहासप्रेमींना पाहण्यासाठी ती उपलब्ध होणार आहेत.

छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष असणारी वाघनखं सातारकर आणि शिवप्रेमींना पाहता येणार असून त्यासाठी छत्रपती शिवाजी संग्रहालयाच्या वतीने वेगाने तयारी सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनख्यांच्या सहाय्याने अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला ती ऐतिहासिक वाघनखे मराठा साम्राज्याची चौथी राजधानी असलेल्या सातारा नगरीत तमाम सातारकरांना पाहता येणार आहेत. 'शिवशस्त्रशौर्य' असे या प्रदर्शनाला नाव देण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंधित तलवार व वाघनखे ही इंग्रजांनी भारतातून इंग्लंडला नेली होती. त्यामधील भवानी तलवार सेंट जेम्स पॅलेसमध्ये रॉयल कलेक्शनचा भाग आहे.

सर्वात प्रभावी गुप्त शस्त्र

वाघनखे उत्कृष्ट पोलादापासून बनवली असून, अतिशय प्रमाणबद्ध आहेत. एक पट्टी त्यावर खालच्या बाजूस बसवलेल्या चार नख्या आणि वरच्या बाजूस अंगठा असे या वाघनखाचे स्वरूप आहे. ही वाघनखे डाव्या हाताची असल्यामुळे त्यातील लहान अंगठी करंगळीत तर मोठी अंगठी तर्जनीच्या बोटात जाते मग चार नखे चार बोटांच्या बरोबर खाली येतात अगदी वाघाच्या पंजाप्रमाणे हे सर्वात लहान व सर्वात प्रभावी गुप्त शस्त्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT