सातारा

Satara News: वाठार स्टेशन येथे हॉटेल रुचीसागरवर पुरवठा विभागाचा छापा

घरगुती तीन सिलिंडर जप्त : हॉटेल व्यावसायिकांनी घेतली धास्ती

पुढारी वृत्तसेवा

सातारा : वाठार स्टेशन, ता. कोरेगाव येथील हॉटेल रुचीसागरवर रविवारी दुपारी जिल्हा पुरवठा विभागाने टाकलेल्या छाप्यात 3 घरगुती गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. कारवाईमुळे जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

आखाती देशातील युद्धामुळे जिल्ह्यात घरगुती व व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या पुरवठ्याबाबत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये तसेच नागरिकांना त्वरित मदत मिळावी यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. तसेच गॅस सिलिंडरच्या पार्श्वभूमीवर तक्रारीच्या अनुषंगाने तालुकास्तरीय संपर्क अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आल्या आहेत. रविवारी दुपारी 4.30 वाजण्याच्या सुमारास सातारा येथील सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी भारतकुमार तुंबडे व त्यांच्या पथकाने हॉटेल रुचीसागरवर छापा टाकून कारवई केली. या कारवाईत हॉटेलमध्ये घरगुती वापराचे तीन सिलिंडर बेकायदेशीररित्या वापरले जात असल्याचे आढळून आले.

हॉटेल व्यवस्थापनाकडे घरगुती सिलिंडरच्या वापराबाबत कोणतीही अधिकृत कागदपत्रे नव्हती. हॉटेलसारख्या व्यावसायिक ठिकाणी घरगुती सिलिंडरचा वापर करणे बेकायदेशीर आहे. या प्रकरणी हॉटेल व्यवस्थापनावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी भारतकुमार तुंबडे व त्यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT